आमची यशोगाथा
गावाविषयी माहिती
केळघर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील प्रगतशील गाव आहे.केळघर गावात पूर्वमुखी हनुमान मंदिर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १३०४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे ३ व , अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०१५ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत केळघर नळ पाणी पुरवठा योजना गावात आहेत
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून हंगामी शेती वरी भात नागली उडीद प्रमुख पिके घेतली जातात. आंबा काजू या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात
केळघर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केळघर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ६सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
केळघर गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
केळघर हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ ५३५.७२ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ६५९ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १३०४ आहे. त्यामध्ये पुरुष६७७ व ६२७महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार चढ उतार प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर वाघ नदी असून ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३४°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी १२२ ते १५० से.मी. पर्जन्यवृष्टी होते. केळघर गाव आंबा काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे
लोकजीवन
केळघर गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून नागली वरी उडीद भात मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
केळघर च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.